Vande Mataram 150 Years - कर्मचारी अन् अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा आदेश

कर्मचारी अन् अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश!

Vande Mataram 150 Years | महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने (Mahayuti Government) एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक क्षणानिमित्त, राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कामावर हजर राहणे बंधनकारक केले आहे.

devendra fadnavis
Devendra Fadnavis - CM of Maharashtra


७ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन 

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankim Chandra Chattopadhyay) यांनी ‘आनंदमठ’ (Anandamath) या कादंबरीतून लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यावर्षी ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ठरलेल्या या गीताचा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांच्या ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या देशभक्तीपर सोहळ्यासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

Vande Mataram 150 Years | शाळांमध्येही होणार विशेष आयोजन

या वर्षपूर्तीनिमित्त राज्याच्या शिक्षण विभागानेही (Education Department) ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हव्हेंबर या कालावधीत एक विशेष सप्ताह साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या सर्व कडव्यांचे गायन करणे आणि या गीताचा गौरवशाली इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पुणे (Pune) तहसीलदारांनीही (Tehsildar) याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहून हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रगीताला अभिवादन करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म